नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
Mahayoddha.in वर तुमचं मनापासून स्वागत आहे.
Krushi Sevak And Gram Sevak Bharti 2026 : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा मोठा वर्ग हा ग्रामीण भागातून येतो. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, दिवसभर शेतात काम करून रात्री अभ्यास करणारे तरुण, आणि मर्यादित साधनांमध्येही मोठी स्वप्न पाहणारे हजारो विद्यार्थी… हे सर्व आपल्या राज्याची खरी ताकद आहेत.
सरकारी नोकरी म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी फक्त “नोकरी” नसते… ती असते आर्थिक स्थैर्य, समाजात मान-सन्मान आणि कुटुंबाचं भविष्य बदलण्याची संधी.
सध्या महाराष्ट्रात दोन अत्यंत महत्त्वाच्या भरती चर्चेत आहेत:
कृषी सेवक (Krushi Sevak)
ग्रामसेवक (Gram Sevak)
ही दोन्ही पदं कमी स्पर्धेत मिळू शकणाऱ्या उत्तम संधी आहेत—जर तुम्ही योग्य तयारी केली तर.
कृषी सेवक आणि ग्रामसेवक भरती 2026
2026 मध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. प्रत्येक सरकारी विभागात रिक्त पदांचा आढावा घेतला जातो आणि नवीन भरती प्रक्रिया सुरू होते.
कृषी विभागात कृषी सेवक
ग्रामविकास विभागात ग्रामसेवक
या दोन्ही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतात.
पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा—
जाहिरात येण्याआधी तयारी करणारा विद्यार्थीच शेवटी selection घेतो.
जो जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करतो, तो नेहमी मागे राहतो.
कृषी व ग्रामसेवक भरती २०२६
(जाहिरात येण्यापूर्वी हा तक्ता तुमच्या अभ्यासाच्या टेबलवर नक्की लिहून ठेवा)
| परीक्षेचा तपशील | कृषी सेवक (Krushi Sevak) | ग्रामसेवक (Gram Sevak – कंत्राटी) |
|---|---|---|
| शैक्षणिक पात्रता | B.Sc Agriculture / Diploma | १२ वी (६०% गुणांसह) किंवा कृषी पदविका (Diploma) |
| वयोमर्यादा (Age Limit) | खुला गट: ३८ वर्षे, मागासवर्गीय: ४३ वर्षे | खुला गट: ३८ वर्षे, मागासवर्गीय: ४३ वर्षे |
| परीक्षेचे स्वरूप | ऑनलाईन (TCS / IBPS पॅटर्न) | ऑनलाईन (TCS / IBPS पॅटर्न) |
| एकूण प्रश्न व गुण | १०० प्रश्न (२०० गुण) | १०० प्रश्न (२०० गुण) |
| निवड प्रक्रिया | फक्त लेखी परीक्षा (Merit List) | फक्त लेखी परीक्षा (Merit List) |
| पगार (सुरुवातीला) | १६,००० रुपये (पहिले ३ वर्षे) | १६,००० रुपये (पहिले ३ वर्षे) |
(टीप: 3 वर्षांनंतर दोन्ही पदे permanent होतात आणि पगारात मोठी वाढ होते..)
कृषी सेवक भरती – Complete Guide
कृषी सेवक ही पोस्ट कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. सर्व माहिती खाली दिली आहे ती माहीत पूर्ण वाचा
परीक्षा स्वरूप
- मराठी – 20 प्रश्न
- इंग्रजी – 20 प्रश्न
- GK – 20 प्रश्न
- गणित + Reasoning – 20 प्रश्न
- कृषी विषय – 60 प्रश्न
एकूण = 100 प्रश्न (200 गुण)
सर्वात महत्त्वाचा भाग = कृषी विषय (120 गुण)
कृषी सेवक – यशस्वी होण्यासाठी रणनीती
कृषी सेवक परीक्षेत selection मिळवण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे:त्याची पूर्ण माहिती आम्ही खाली दिली आहे तर पूर्ण माहिती नक्की वाचा
Technical Subject Strong असणे
काय करायचं?
- कृषी पदविका/पदवीची पुस्तके वाचा
- स्वतःच्या short notes तयार करा
- दररोज revision करा
- PYQ (Previous Year Questions) सोडवा
बाकी subjects average असले तरी चालतात पण कृषी विषय strong असणं mandatory आहे कारण अभ्यास करणे खूप IMP आहे
गावात राहून सरकारी नोकरी
ग्रामसेवक ही पोस्ट ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. कारण या मध्ये गावात राहून नोकरी करता येते आणी या मध्ये पगार पण भरपूर आहे त्या मुळे तुम्ही ही संधी नका सोडू आणि त्या संधी चे सोने करा कारण एकदा गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत.
पात्रता
- 12वी (60% marks)
किंवा - Agriculture Diploma
परीक्षा रचना
- मराठी – 15 प्रश्न
- इंग्रजी – 15 प्रश्न
- GK – 15 प्रश्न
- गणित – 15 प्रश्न
Total = 60 प्रश्न - Technical (Panchayat Raj + Rural Development) – 40 प्रश्न
Total = 100 प्रश्न (200 गुण)
ग्रामसेवक – महत्वाचे विषय
ग्रामसेवक परीक्षेत खालील विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत:
- पंचायत राज व्यवस्था
- ग्रामपंचायत अधिनियम
- ग्रामीण विकास योजना
- सरकारी योजना
- समाजसुधारक
- कृषी संबंधित माहिती
या 40 प्रश्नांमधून selection ठरतो
TCS / IBPS Pattern समजून घ्या
आजकाल सर्व सरकारी परीक्षा TCS आणि IBPS कंपन्या घेतात.
या पॅटर्नची खासियत:
- Speed based exam
- Logic based questions
- Time pressure जास्त
English Section Strategy
- Vocabulary
- Synonyms & Antonyms
- Cloze Test
- Reading Comprehension
दररोज 10 नवीन शब्द शिका
Maths & Reasoning Strategy
Maths & Reasoning हा सर्वात scoring पण time-consuming section आहे.
महत्त्वाचे टॉपिक्स:
- Percentage
- Profit & Loss
- Time & Work
- Number Series
- Puzzle
- Syllogism
अनेक विद्यार्थी सचिन ढवळे सरांची shortcut techniques वापरतात
Exam Preparation Strategy (Smart Planning)
Step 1: Basics Strong करा
सुरूवातीला तुमचं बेसिक पूर्ण करा आणि मग बाकीचा अभ्यास बघूत आपण
- पाढे पाठ करा
- squares & cubes
- basic arithmetic
Step 2: Concept + Tricks
- formulas पेक्षा logic शिका
- shortcut methods वापरा
Step 3: Practice
- रोज 50 Maths + 50 Reasoning
- PYQ solve करा
Practice = Selection
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी Study Plan
सकाळ
- शेतातील काम + audio lectures
- Current Affairs ऐका
दुपार
- Library Study
- Technical Subject Revision
रात्री
- Maths Practice
- Reasoning Practice
- PYQ Solve
Career Growth (Future Scope)
कृषी सेवक
- 3 वर्षांनी → कृषी सहाय्यक
- पुढे → मंडळ कृषी अधिकारी
ग्रामसेवक
- 3 वर्षांनी → Permanent
- पुढे → VDO
- पुढे → Extension Officer
Growth खूप मोठा आहे
Common Mistakes
- फक्त video पाहणे
- Practice न करणे
- PYQ ignore करणे
- Consistency नसणे
- खूप पुस्तके घेणे
या चुका टाळा
Motivation (Real Truth)
मित्रांनो,
ग्रामीण विद्यार्थ्यांना अडचणी जास्त असतात… पण संधीही तितकीच मोठी असते.
अनेक विद्यार्थी शेतात काम करून selection घेतात
काही रात्री अभ्यास करून यश मिळवतात
फरक फक्त एकच—Consistency
विद्यार्थ्यांसाठी खास: गणिताची तयारी करताना जर तुम्हाला सूत्रांशिवाय गणिते सोडवायची असतील, तर आमच्या वेबसाईटवरील[शून्यातून ‘गणित आणि बुद्धिमत्ता’ कसं पक्कं करायचं? सचिन ढवळे सरांचा A to Z गाईड] हा लेख नक्की वाचा. तुमची गणिताची भीती कायमची दूर होईल!
जाहिरात येण्यापूर्वी करा ही ५ कामे!
मित्रांनो, जाहिरात कधीही येऊ शकते, पण जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर वर्षभराची मेहनत एका सेकंदात मातीत जाईल. एप्रिल २०२६ सुरू आहे, त्यामुळे खालील कामे लगेच पूर्ण करा:
- १. नॉन-क्रिमिलेअर (Non-Creamy Layer) रिन्यू करा: नवीन वर्ष चालू झाले आहे. जुने NCL ३१ मार्चला Expire झाले असेल. त्यामुळे लगेच तहसीलमध्ये जाऊन नवीन (२०२६-२७) साठी वैध असलेले NCL काढून घ्या. नंतर फॉर्म सुटल्यावर सर्व्हर डाऊन असतो.
- २. डोमिसाईल (Domicile Certificate): तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (Digital Barcode असलेला) तयार ठेवा.
- ३. कृषी पदविका/पदवीची मूळ प्रमाणपत्रे (Degree/Diploma Certificate): नुसती पास झाल्याची मार्कशीट असून चालत नाही, तर विद्यापीठाचे मूळ ‘Board Certificate’ किंवा ‘Degree Certificate’ फाईलमध्ये लावून ठेवा.
- ४. MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र: ग्रामसेवक पदासाठी संगणक ज्ञान आवश्यक असते. MSCIT चे सर्टिफिकेट रेडी ठेवा.
- ५. जुन्या प्रश्नपत्रिकांचे (PYQ) विश्लेषण: अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मागील ३-४ वर्षांच्या कृषी सेवक आणि ग्रामसेवक पदांच्या प्रश्नपत्रिका (विशेषतः TCS/IBPS ने घेतलेल्या) सोडवून पहा. आयोगाची ‘नस’ ओळखल्याशिवाय अभ्यास करू नका.
Best Books List
मुलांचा सर्वात मोठा गोंधळ पुस्तकांच्या बाबतीत उडतो. बाजारात शेकडो पुस्तके आहेत, पण मेरीटमध्ये येण्यासाठी मोजकीच आणि ‘ऑथेंटिक’ (Authentic) पुस्तके वाचावी लागतात. ती आम्ही पुढील प्रमाणे दिली आहेत ती बघा आणि भरपूर अभ्यास करा,
अ) कृषी सेवक (Krushi Sevak) साठी:
- YCMOU ची पुस्तके (सर्वात महत्त्वाची): यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची (YCMOU) कृषी पदविकेची सर्व पुस्तके (V100 सिरीज) ‘बेस’ म्हणून नक्की वाचा. IBPS/TCS बरेच प्रश्न थेट यातूनच उचलतात.
- ११वी आणि १२वी ची कृषी विज्ञानाची पुस्तके: शालेय पाठ्यपुस्तके (State Board) बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
- बाजारपेठेतील संदर्भ पुस्तके: ‘कृषी शास्त्र’ (K’Sagar पब्लिकेशन) किंवा ज्ञानदीप ॲकॅडमीचे कृषी घटकाचे पुस्तक रिव्हिजनसाठी फायद्याचे ठरते.
ब) ग्रामसेवक (Gram Sevak) साठी:
- पंचायत राज: किशोर लवटे सरांचे ‘पंचायत राज’ हे पुस्तक ग्रामसेवक भरतीसाठी ‘बायबल’ मानले जाते. यातून कलम आणि समित्यांचे प्रश्न बाहेर जात नाहीत.
- तांत्रिक घटक: तांत्रिक प्रश्नांसाठी (४० प्रश्न) ‘ग्रामसेवक संपूर्ण मार्गदर्शक’ (के. सागर किंवा विद्याभारती प्रकाशन) या पुस्तकातून कृषी आणि ग्रामीण विकासाच्या योजना वाचून ठेवा.
प्रमोशन कसे मिळते?
मित्रांनो, माहीत आहे का बऱ्याच जणांना वाटते की ग्रामसेवक किंवा कृषी सेवक म्हणजे छोटी नोकरी आहे. पण तसे अजिबात नाही. ही पदे तुम्हाला शासनाच्या मोठ्या खुर्चीवर घेऊन जाऊ शकतात! ते कसे आपण पुढे बघूत.
- कृषी सेवकाचे प्रमोशन: ३ वर्षे कृषी सेवक म्हणून काम केल्यावर तुम्ही कायमस्वरूपी ‘कृषी सहाय्यक’ (Krushi Sahayyak) बनता (ज्याचा पगार ३५ ते ४० हजारांच्या घरात जातो). त्यानंतर प्रमोशनने तुम्ही ‘मंडळ कृषी अधिकारी’ (Mandal Krushi Adhikari – Class 2) या राजपत्रित पदापर्यंत पोहोचू शकता.
- ग्रामसेवकाचे प्रमोशन: ३ वर्षांनंतर तुम्हाला ग्रामसेवकाची पूर्ण वेतनश्रेणी लागू होते. त्यानंतर उत्कृष्ट काम केल्यास प्रमोशन मिळून तुम्ही तालुक्याला ‘ग्रामविकास अधिकारी’ (VDO – Village Development Officer) आणि त्यानंतर थेट ‘विस्तार अधिकारी’ (Extension Officer) बनू शकता!
FAQ
प्रश्न १: ग्रामसेवक भरतीसाठी १२ वी ला ६०% नसतील तर पदवीधर (Graduation) मुले फॉर्म भरू शकतात का?
उत्तर: जर १२ वी ला ६०% नसतील, तर केवळ पदवी (B.A, B.Com, B.Sc) असून चालत नाही. अशा वेळी तुमच्याकडे समाजकल्याण, किंवा कृषी विषयातील पदवी/पदविका असणे अनिवार्य आहे. अधिकृत जाहिरातीत याचे सविस्तर नियम दिले जातात. ते तुम्ही बघू शकता त्या मध्ये
प्रश्न २: कृषी सेवक आणि ग्रामसेवक या दोन्ही पदांसाठी एकाच वेळी अर्ज करता येतो का?
उत्तर: होय, जर तुमची शैक्षणिक पात्रता दोन्ही पदांसाठी बसत असेल (उदा. तुमचा Agri Diploma झाला असेल), तर तुम्ही दोन्ही पदांसाठी स्वतंत्र फॉर्म भरून परीक्षा देऊ शकता.
प्रश्न ३: ३ वर्षांच्या कंत्राटी काळानंतर नोकरी पक्की (Permanent) होते का?
उत्तर: १००% होते! शासनाच्या नियमानुसार, पहिली ३ वर्षे समाधानकारक काम केल्यास, कृषी सेवक ‘कृषी सहाय्यक’ बनतो आणि ग्रामसेवक कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतला जातो, व त्यांना संपूर्ण वेतनश्रेणी (Full Salary) मिळते.
Final Conclusion
मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचे एक कटू सत्य आहे — “जेव्हा जाहिरात येते, तेव्हा अभ्यास करण्याची वेळ निघून गेलेली असते; तेव्हा फक्त उजळणी (Revision) करण्याची वेळ असते!”
कृषी सेवक आणि ग्रामसेवक भरती ही फक्त नोकरी नाही…
ती आयुष्य बदलण्याची सुवर्णसंधी आहे.
जर तुम्ही आजपासूनच तयारी सुरू केली, तर तुमचं नाव पुढच्या selection list मध्ये असू शकतं.
आजपासून सुरू करा
रोज अभ्यास करा
PYQ सोडवा
हार मानू नका
तुमची अडचण सांगा: मित्रांनो, तुम्हाला कृषी सेवक किंवा ग्रामसेवक भरतीच्या कोणत्या विषयाची (Syllabus) सर्वात जास्त भीती वाटते? खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण महायोद्धावर लवकरच त्यावर मोफत ट्रिक्स आणि स्टडी मटेरिअल घेऊन येऊ.
तुमच्या मित्रांना शेअर करा: तुमचे जे मित्र ‘Agri Diploma/Degree’ करत आहेत किंवा १२ वी पास झाले आहेत, त्यांना हा लेख WhatsApp च्या स्टडी ग्रुपवर आणि स्टेटसवर नक्की शेअर करा. योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन कोणाचे तरी आयुष्य घडवू शकते!
अधिकृत अपडेट्स आणि अचूक माहितीसाठी नेहमी भेट देत राहा: Mahayoddha.in (रडायचं नाही, लढायचं! )