vitthal-kangane-sir-mpsc-police-bharti-study-plan-2026– अभ्यासाचे नियोजन कसे करावे? संपूर्ण माहिती

MPSC / पोलीस भरती स्टडी प्लॅन 2026 – विठ्ठल कांगणे सरांच्या विचारांवर आधारित अचूक मार्गदर्शन

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून, साध्या परिस्थितीतून मोठी स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये एक नाव नक्की सापडेल विठ्ठल कांगणे सर. अभ्यास करताना जेव्हा कंटाळा येतो, मन खचतं, किंवा परिस्थितीवर राग येतो… तेव्हा सरांचा एक व्हिडिओ पुरतो. त्यांचे शब्द थेट मनाला भिडतात आणि पुन्हा एकदा आपण पुस्तक उघडतो.

पण मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट आहे फक्त मोटिव्हेशनने भरती होत नाही. त्यासाठी लागतो प्लॅन… आणि तोही प्लॅन अचूक असायला हवा !

मित्रांनो २०२६ च्या MPSC आणि पोलीस भरतीमध्ये स्पर्धा खूपच वाढली आहे. त्यामुळे आम्ही कांगणे सरांच्या विचारांवर आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित हा एक प्रॅक्टिकल स्टडी प्लॅन तयार केला आहे तो नक्की वाचा .

जर तुम्ही हा प्लॅन पुढील ६ महिने प्रामाणिकपणे फॉलो केला, तर तुमचं यश कोणीही थांबवू शकत नाही.

” भावानो हा प्लॅन फक्त MPSC किंवा कॉन्स्टेबल पदासाठी नाही, तर पोलीस पाटील (Police Patil), तलाठी किंवा कोणत्याही जिल्हास्तरीय भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक best प्लान आहे.”

यशाची पहिली पायरी – Mindset

कांगणे सर नेहमी एक गोष्ट सांगतात ती म्हणजे
“गरिबीत जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण गरिबीत मरणं आपल्या हातात आहे.” अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वतःला तीन गोष्टी नक्की विचारा एकदा :

  • नाटके संपवा
    “माझ्याकडे पैसे नाहीत”, “इंग्रजी कच्चं आहे”—हे आता चालणार नाही.
    आज सगळं फ्रीमध्ये उपलब्ध आहे.
  • ध्येय ठरवा
    कॉन्स्टेबल? PSI? तलाठी? किवा कोणतीही एक सरकारी नोकरी
    जे काही असेल ते एका कागदावर लिहा आणि रोज दिसेल तिथे लावा.
  • वेळेची किंमत समजा मित्रांनो
    वेळ खूप म्हणातवाचा आहे जर आजचा वेळ आणि वाया गेलेला दिवस म्हणजे तुमच्या यशापासून एक पाऊल मागे टाकतो तुम्हाला.

२४ तासांचे स्मार्ट वेळापत्रक

सरांच्या मते, जे विद्यार्थी वेळेचे गुलाम होतात, तेच भविष्यात राजे बनतात. भावानो आणि बहिनिनो हे आहे तुमच्या दिवसाचे अचूक नियोजन: जो कोणी जे वेळेचे नियोजन रोज फॉलो करेल ना तो नक्की एक दिवस काही तरी करेल जीवनात किवा कोणत्या तरी नोकरीला लागेल जर मनात जिद्द ठेऊन हे नियोजन वाचा :

सकाळ (5:00 – 9:00) – शरीर आणि शिस्त

  • 5:00 – उठणे ( खर तर सकाळी उठायला सर्वांना कंटाळा येतो पण तुम्ही रोज सकाळी उठा कारण एक दिवस जर तुम्ही हे नियोजन फॉलो नाही ना केले तर कोणी दूसरा मित्र तुमची नोकरी घेईल त्या मुळे रोज सकाळी लवकर उठायचे )
  • 5:30 ते 7:30 – ग्राउंड प्रॅक्टिस ( सकाळी लवकर उठल्यावर तूहमला सुरुवातिला Running, गोळाफेक आणि 100 मीटर धावणे हे कारचे आहे आणि मग ग्राऊंड वर काही वेळ शांत व्यायाम करायचं आहे )
  • 7:30 ते 8:30 – आंघोळ + नाश्ता ( एकदा तुम्ही ग्राऊंड वरुण आले की आधी आंघोळ करा कारण आपण जेव्हा रनिंग करून येतो तेव्हा खूप घाम आलेला असतो आणि आपण जर तसेच राहिलो तर आपण बिमार पडू त्या मुळे आधी आंघोळ आणि मग नाश्ता )
  • 8:30 ते 9:00 – Current Affairs ( रोज घरी आलेला पेपर वाचन करणे कारण पेपर मधील तुम्हाला चालू घडमोडे कळतील आणि रोज नवीन नवीन माहिती कळेल )

लक्षात ठेवा: ग्राउंड = 50% यश

सकाळ (9:00 – 1:00) – कठीण विषय

  • 9:00 – 11:00 → GK (इतिहास, भूगोल, राज्यघटना) इतिहास, भूगोल, पंचायत राज किंवा राज्यघटना. सकाळी सकाळी तुमचे मन शांत असते, त्यामुळे लक्ष्यात चांगले राहिते .
  • ११:०० ते ११:१५ AM: १५ मिनिटांचा ब्रेक.
  • 11:15 – 1:00 → मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे किंवा मो. रा. वाळंबे यांचे पुस्तक नक्की वाचा कारण . मराठी व्याकरण हा स्कोअरिंग विषय आहे. आणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याचे टार्गेट या मध्ये नक्की ठेवा तुम्ही.

दुपार (2:00 – 5:00) – गणित आणि बुद्धिमत्ता

  • जेवणानंतर झोप येणे सर्वांना स्वाभाविक आहे मित्रांनो. या वेळेत तुम्ही इतिहास किंवा भूगोल वाचू नका कारण त्या मिळे तुंहला झोप येते त्या जागी तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता करा .
  • गणित: गणित सोडवत बसा कारण या मुळे तुम्हाला झोप येणार नाही
  • Reasoning बुद्धिमत्ता : गणिता सोबत बुद्धिमता पण सोडून बघा
  • PYQ Questions हा एक सरावासाठी म्हतवाचा विषय आहे कारण या मुळे तुम्ही पुढे जाल
    मित्रांनो गणित तुमच्या मेंदूला जागं ठेवतं.

संध्याकाळ (6:00 – 10:00) – Practice + Revision

  • 6:00 – 8:00 → मागील प्रश्नपत्रिका मागील ५ वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. MPSC आणि पोलीस भरतीत अनेक प्रश्न रिपीट होतात मित्रांनो
  • 9:00 – 10:00 → Revision दिवसभरात जे काही वाचले आहे, त्याची फक्त उजळणी करा. नवीन काहीही वाचू नका कारण नवीन जर वाचले तर तुम्ही सकाळ पासून जो अभ्यास केला तो विसरल .
  • १०:३० PM: मोबाईल बाजूला ठेवा आणि शांत झोपा (७ तासांची झोप अत्यंत आवश्यक आहे).

नवीन काहीही शिकू नका—फक्त उजळणी करा.

खालील table नक्की बघा मित्रांनो आणि तुमच्या वहीत लिहून ठेवा आणि रोज follw करा

वेळकाय करायचे
5:00 AMउठणे
5:30–7:30ग्राउंड प्रॅक्टिस
9:00–11:00GK अभ्यास
2:00–5:00गणित
6:00–8:00PYQ
9:00–10:00रिव्हिजन

कांगणे सरांचे ३ कडक नियम

  • Digital Detox Instagram, WhatsApp = सर्वात मोठे शत्रू Selection होईपर्यंत uninstall करा
  • Consistency दररोज 8 तास अभ्यास करा… पण रोज करा!
  • Circle बदला Negative लोक = स्वप्नांचे शत्रू तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा

Smart Work Strategy

फक्त गधेमेहनत करू नका, स्मार्ट बना.

  • Syllabus पाठ करा
  • स्वतःच्या नोट्स तयार करा
  • कमी पुस्तके पण वारंवार वाचा
  • १०० पुस्तके १ वेळा वाचण्यापेक्षा
  • १ पुस्तक १०० वेळा वाचा

बुकलिस्ट (Simple & Effective)

  • मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे किंवा मो. रा. वाळंबे
  • गणित व बुद्धिमत्ता: पंढरीनाथ राणे किंवा अनिल सर
  • सामान्य ज्ञान (GK): तात्यांचा ठोकळा (एकनाथ पाटील) हा नक्की वाचा मित्रांनो
  • चालू घडामोडी: पृथ्वी परिक्रमा (टीप: बाजारातील नवीन पुस्तकांच्या मागे पळण्यापेक्षा ही ‘Standard’ पुस्तके ५ वेळा वाचा किवा वाचतच रहा .)

फालतू नवीन पुस्तकांच्या मागे धावू नका

ग्राउंडसाठी खुराक (Diet)

पोलीस भरतीमध्ये ५०% यश हे ग्राउंडवर अवलंबून असते. अभ्यासासोबतच तुम्हाला जेवणाचे महत्त्व पण पाहिजे

ग्राउंडपूर्वी → केळी / मनुके नंतर → मोड आलेले कडधान्य + गूळ पाणी → 4–5 लिटर

  • सकाळी ग्राउंडपूर्वी: १ केळी किंवा थोडे काळे मनुके नक्की खा .
  • ग्राउंडवरून आल्यावर: मित्रांनो मोड आलेले मूग, मटकी, हरभरा, बदाम आणि थोडा गुळ (हा गरीबाचा मुलाचा बदाम आहे, जो त्याचा स्टॅमिना वाढवतो त्यांना मदत करतो ).
  • पाणी: दिवसभरात किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या, तुम्हाला धावताना दम लागणार नाही आणि चक्कर येणार नाही .

शरीर फिट = मेंदू फिट

Real अनुभव (थोडक्यात)

VK सरांच्या कडक विचारांनी आणि या अचूक टाईम टेबलने महाराष्ट्रातील हजारो तरुणांच्या अंगावर आज वर्दी आहे. हा स्टडी प्लॅनचा वापर करून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे हे काही अनुभव नक्की वाचा

१. “मोबाईल सोडला आणि स्वप्न पूर्ण झाले!” हिंगोलीच्या छोट्या गावातून . घरची परिस्थिती बेताची होती. दोन वर्ष पोलीस भरतीत २–३ मार्कांनी नापास झालेला मित्र, खूपच खचून गेलो होतो.

मग विठ्ठल कांगणे सरांचा हा रूल त्यांनी फॉलो केला त्यांनी इंस्टाग्राम बंद केले , आणि रोज सकाळी ५ ला उठून सराव करू लागला, आणि त्यांनी दुपारी गणितावर फोकस केला.

आज तो मित्र महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी ला आहे … आणि खरं सांगायचं तर, ह्या एका निर्णयाने त्याचे पूर्ण आयुष्य बदलुन गेले .

२. “शेतीची कामे सांभाळून मिळवले यश!” “एका मित्राचे वडील शेतकरी होते . तिलाअभ्यासासाठी पुण्यात किंवा मोठ्या शहरात जाऊन अभ्यास शक्य नव्हता .

त्यांनी गावाकडूनच तयारी करत असे कांगणे सरांनी सांगितल्याप्रमाणे तो फापटपसारा वाचण्यापेक्षा त्यांनी ‘स्वतःच्या नोट्स’ काढण्यावर आणि ‘मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका’ (PYQ) वारंवार सोडवण्यावर ज्यास्त भर दिला.

त्याला दिवसभर घरची आणि शेतीची कामे करून तो रात्री ९ ते १० या वेळेत फक्त (Revision) करत असे. सातत्य आणि योग्य नियोजनामुळे तो आज भरती परीक्षा पास झाला.

हा स्टडी प्लॅन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप imp ठरला आहे.” – यशस्वी महिला उमेदवार

VK सर सोशल मीडिया अकाऊंट्स (Official Links)

  • YouTube Channel: Vitthal Kangane (येथे १३ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. VK सरांचे सर्व नवीन लाईव्ह सेमिनार आणि अभ्यासाच्या टिप्स येथेच मिळतात.)
  • Instagram: @vitthal_kangne (येथे १७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दैनंदिन मोटिव्हेशन आणि शॉर्ट अपडेट्ससाठी हे अकाऊंट तुम्ही नक्की फॉलो करा.)
  • Academy App/Info: त्यांच्या ॲकॅडमीचे नाव ‘स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणी’ असे आहे. या नावाचे ॲप सुद्धा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे (VKCLASS APP) तुम्ही नक्की डाउनलोड करा
  • X : Vitthal Kangane कांगणे सर सध्या Twitter वर जास्त सक्रिय नाहीत. त्यांचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स, अभ्यासाच्या टिप्स आणि मोटिव्हेशनल व्हिडिओ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे YouTube आणि Instagram अकाऊंटच फॉलो करावे.

(टीप: फेसबुकवर त्यांच्या नावाने अनेक फॅन पेजेस (Fan Pages) आहेत, त्यामुळे अधिकृत आणि थेट माहितीसाठी युट्युब आणि इंस्टाग्रामचाच संदर्भ द्यावा.)

FAQs (थोडक्यात)

Q: रोज किती तास अभ्यास?
6–8 तास + ग्राउंड

Q: गणित कमजोर आहे?
5वी ते 8वी पासून सुरुवात करा

Conclusion

मित्रांनो,
ही परीक्षा म्हणजे शर्यत आहे… आणि इथे तोच जिंकतो जो शेवटपर्यंत टिकतो.

मोटिव्हेशन तुम्हाला सुरुवात करून देईल…
पण शेवटपर्यंत पोहोचवणार आहे तुमचं कष्ट आणि सातत्य.

आजपासून सुरू करा. आत्तापासून सुरू करा.

“रडायचं नाही… लढायचं!”

Disclaimer

हा लेख कोणत्याही प्रकारे विठ्ठल कांगणे सर यांच्याशी अधिकृतपणे जोडलेला नाही. Mahayoddha.in वरील हा स्टडी प्लॅन विठ्ठल कांगणे सरांच्या विविध प्रेरणादायी भाषणांतून, त्यांच्या विचारांतून आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून केवळ ‘शैक्षणिक हेतूने’ (Educational Purpose) संकलित केला आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार या वेळापत्रकात बदल करून घ्यावा.

mahayoddha

Leave a Comment