नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
Maharashtra TET Complete Preparation Guide : शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व महायोद्धा मित्रांचे मनापासून स्वागत आहे.
मित्रांनो, शिक्षक हा केवळ एक व्यवसाय नसतो तर तो समाज घडवणारा शिल्पकार असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यात प्रकाश टाकण्याचं काम शिक्षक करत असतो. पण आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त पदवी असून शिक्षक होता येत नाही. त्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार करावा लागतो—तो म्हणजे MAHA-TET (Maharashtra Teacher Eligibility Test).
येत्या जून 2026 मध्ये होणारी ही परीक्षा तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही प्रश्न असतात—
अभ्यास कुठून सुरू करायचा?
syllabus काय आहे?
पात्रता काय आहे?
पास कसे व्हायचे?
या सर्व प्रश्नांची सोपी आणि स्पष्ट उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.
MAHA-TET परीक्षा म्हणजे काय?
MAHA-TET ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा आहे.
जर तुम्हाला महाराष्ट्रातील शासकीय किंवा खासगी शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षक व्हायचे असेल, तर ही परीक्षा पास करणे आवश्यक आहे.
ही परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाते:
पेपर 1
इयत्ता 1 ली ते 5 वी साठी शिक्षक होण्यासाठी
पेपर 2
इयत्ता 6 वी ते 8 वी साठी शिक्षक होण्यासाठी
दोन्ही पेपर: जर तुम्ही दोन्ही गटांसाठी पात्र असाल, तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता
MAHA-TET पात्रता (Eligibility Criteria)
अनेक मित्र विचारतात की, “भाऊ, मी डी.एड केलंय, मी पात्र आहे का?” तर नीट समजून घ्या: सर्व माहिती पुढे दिली आहे तर सविस्तर माहिती बघा
पेपर 1 साठी:
- 12 वी पास (किमान 50% गुण)
- D.Ed / D.T.Ed असणे आवश्यक
पेपर 2 साठी:
- Graduation पूर्ण असणे आवश्यक
- B.Ed / D.Ed / D.T.Ed आवश्यक
महत्वाची गोष्ट:
Final year विद्यार्थी (appearing candidates) देखील अर्ज करू शकतात.
मित्रांनो, जर तुम्ही सध्या डी.एड किंवा बी.एड च्या शेवटच्या वर्षाला असाल, तरीही तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ‘अॅपियर’ (Appear) असताना परीक्षा देण्याचा फायदा असा की, तुमचा अभ्यास झालेला असतो. त्या मुळे तुम्हाला सर्व काही सोपे जाईल त्या मुळे सर्व जन आधी पासून अभ्यास करतात.
परीक्षा स्वरूप (Exam Pattern)
MAHA-TET मध्ये एकूण 150 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो.
या मध्ये विशेष म्हणजे की Negative Marking नाही, त्यामुळे सर्व प्रश्न attempt करता येतात.
पेपर 1 Pattern
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| बालमानसशास्त्र | 30 | 30 |
| मराठी | 30 | 30 |
| इंग्रजी | 30 | 30 |
| गणित | 30 | 30 |
| परिसर अभ्यास | 30 | 30 |
| Total | 150 | 150 |
पेपर 2 Pattern
- बालमानसशास्त्र – 30 प्रश्न
- भाषा (मराठी/इंग्रजी) – 30 प्रश्न
- गणित/विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे – 60 गुण
Science background विद्यार्थ्यांसाठी Maths & Science
Arts/Commerce विद्यार्थ्यांसाठी Social Science
विषयानुसार अभ्यास रणनीती (Study Strategy)
1. बालमानसशास्त्र (Most Important Subject)
हा विषय selection ठरवतो.
काय करायचं?
- Piaget, Vygotsky सिद्धांत समजून घ्या
- रटून पाठ करू नका
- उदाहरणांसह अभ्यास करा
टिप्स: मानसशास्त्रज्ञांचे सिद्धांत (उदा. पियाजे, वायगोत्स्की) केवळ पाठ करू नका, तर ते समजून घ्या. विद्यार्थ्यांच्या वागण्यामागचं कारण काय असू शकतं, असा विचार करून प्रश्न सोडवा. तेव्हा तुम्ही एक शिक्षक व्हाल.
2. मराठी व्याकरण
महत्वाचे टॉपिक्स:
- समास
- अलंकार
- प्रयोग
- समानार्थी शब्द
मो. रा. वाळंबे यांचे पुस्तक उपयुक्त आहे.
काय वाचायचे? प्रयोग, समास, अलंकार आणि समानार्थी-विरुद्धार्थी शब्द. मो. रा. वाळंबे सरांचे पुस्तक या विषयासाठी ‘बायबल’ आहे.
3. इंग्रजी व्याकरण
मुख्य फोकस:
- Tense
- Parts of Speech
- Sentence formation
रोज 10 नवीन शब्द शिका
टिप्स: Parts of Speech, Tense, आणि Direct-Indirect Speech यावर जास्त भर द्या. रोज किमान १० नवीन शब्द पाठ करा. हा विषय सोपा वाटतो पण नाही.
4. गणित व परिसर अभ्यास
गणितासाठी:
- नियमित सराव
- basic formulas
परिसर अभ्यास:
- 3rd ते 10th Balbharati books वाचा
गणितासाठी सराव महत्त्वाचा आहे. तर परिसर अभ्यासासाठी इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतची ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके वाचून काढा. त्याबाहेरचं काहीही येत नाही. तुम्ही इतक सर्व जरी केल ना तरी पण तुम्ही शिक्षक नक्की व्हाल. त्यामुळे सर्वांनी अभ्यास नक्की करा.
Previous Year Question Papers (PYQ Importance)
मित्रांनो, ही एक खूप मोठी चूक अनेक विद्यार्थी करतात—फक्त पुस्तके वाचतात पण प्रश्नपत्रिका सोडवत नाहीत.
PYQ का महत्वाचे आहे?
- Exam pattern समजतो
- repeated questions कळतात
- confidence वाढतो
किमान 5-6 वर्षांचे पेपर solve करा
टीईटी परीक्षेत अनेक प्रश्न किंवा संकल्पना पुन्हा पुन्हा विचारल्या जातात. त्यामुळे गेल्या ५-६ वर्षांच्या प्रश्नपत्रिका चाळून काढा. तुम्हाला प्रश्नांची ‘लेव्हल’ समजेल.
. कृषी सेवक आणि ग्रामसेवक भरतीचा सविस्तर मार्गदर्शक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! Krushi Sevak And Gram Sevak Bharti 2026 – Full A to Z Preparation Guide
MAHA-TET Study Time Table (Ideal Plan)
आता तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. तर रोजचे नियोजन असं करा ज्या मुळे तुम्हाला सर्व काही सोपे जाईल आणि पुढे चालुल ज्यास्त लोड येणार नाही:
सकाळ: बालमानसशास्त्र (2 तास)
दुपार: गणित (2 तास)
संध्याकाळ: भाषा + EVS (2 तास)
रात्री: revision (1 तास)
हा टाइम टेबल तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही नोकरीला लागू शकता पण अभ्यास करणे हे तुमच्यासाठी खूप म्हतवाचे आहे त्या मुले नेहमी अभ्यास करा.
आवश्यक कागदपत्रे (Documents Checklist)
फॉर्म सुटल्यावर घाई नको, म्हणून हे आधीच तयार ठेवा:
परीक्षा फ्रॉम भरण्या आधी हे सर्व कागदपत्रे नक्की काढा कारण पुढे जर लवकर भरती निघाली तर तुम्ही योग्य वेळी तयार रहाआणि खालील कागदपत्रे नक्की काढा.
- 10वी मार्कशीट
- 12वी मार्कशीट
- Graduation प्रमाणपत्र
- D.Ed / B.Ed प्रमाणपत्र
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेला).
- जातीचा दाखला (गरज असल्यास).
- फोटो व signature
यशाचा Secret Formula
मित्रांनो, टीईटी परीक्षा ही knowledge पेक्षा consistency test आहे.
रोज अभ्यास करा
revision करा
panic करू नका
एका प्रश्नाला फक्त 60 सेकंद मिळतात—time management खूप महत्वाचा आहे.
मित्रांनो, अभ्यास तर सगळेच करतात, पण पास तेच होतात जे ‘सातत्य’ ठेवतात. TET परीक्षा फक्त तुमच्या ज्ञानाची नाही, तर तुमच्या ‘संयमाची’ परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षेत 150 मिनिटांत 150 प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे एका प्रश्नाला फक्त ६० सेकंद! त्यामुळे वेळेचं नियोजन करायला आतापासूनच शिका. कारण वेळ आहे तर सर्व आहे त्या मुळे वेळेचे नियोजन योग्य करा
FAQ
प्रश्न १: टीईटी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?
उत्तर: सध्याच्या कलानुसार परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता जास्त आहे, पण अंतिम निर्णय अधिकृत पत्रकावर अवलंबून असेल. त्या मुळे दोन्ही साथी तुम्ही तयार रहा कारण कधी काय होईल सांगता येत नाही॰
प्रश्न २: परीक्षेसाठी किती मार्क मिळवणं गरजेचं आहे?
उत्तर: खुला प्रवर्ग (Open) साठी ९० गुण (६०%) आणि इतर प्रवर्गांसाठी ८२ गुण (५५%) मिळवणे आवश्यक आहे. त्या मुळे सर्वांनी ज्यास्त अभ्यास करणे खूप imp आहे
प्रश्न ३: एकदा टीईटी पास झाली की ती किती वर्षे चालते?
उत्तर: आता टीईटी प्रमाणपत्राची वैधता ‘लाईफटाईम’ (आजीवन) करण्यात आली आहे. म्हणजे एकदा पास झाले की पुन्हा देण्याची गरज नाही.
Conclusion
मित्रांनो, शिक्षक होणं ही केवळ नोकरी नाही तर समाजसेवा आहे.
MAHA-TET 2026 तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्ही आजपासूनच योग्य तयारी सुरू केली, तर यश तुमच्यापासून दूर नाही.
लक्षात ठेवा:
“Consistency is the key to success.”
last Massage
जर तुम्हाला फायढ्याचे वाटत असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
आणि हो…
आजपासूनच अभ्यास सुरू करा.
अशाच नवनवीन अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी आमचा ‘महायोद्धा’ व्हॉट्सॲप ग्रुप आजच जॉईन करा!